Loksabha 2019 : 'मायावतींना पंतप्रधानपदी पाहायचंय!'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 मार्च 2019

कल्याण यांच्या वक्तव्यानंतर मायावती यांनीही आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पवन कल्याण विराजमान झालेले मला पाहायचे आहे, असे सांगितले.

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांना आम्हाला पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहायचे आहे. हीच आमची इच्छा आहे, असे जनसेना पक्षाचे (जसप) नेते पवन कल्याण यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच येत्या काळात आमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कल्याण म्हणाले, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून बसप आणि जसप या दोन्ही पक्षांत एकमत झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मायावती पंतप्रधान व्हावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यांना पंतप्रधानपदी विराजमान झालेले आम्हाला पाहायचे आहे. आम्हाला आशा आहे, की येत्या काळात आमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल. 

दरम्यान, कल्याण यांच्या वक्तव्यानंतर मायावती यांनीही आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी पवन कल्याण विराजमान झालेले मला पाहायचे आहे, असे सांगितले.

 

Web Title: We would like to see Mayawati as the prime minister says Pawan Kalyan