LokSabha 2019 : काहीही होऊ दे...राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

...तर प्रचारात उतरणार

प्रचाराची पद्धत ठरवली जाणार आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या निर्णयानुसार प्रचाराची दिशा ठरवणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले. 

LokSabha 2019 : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाने मला अत्यंत वेदना झाल्या. माझ्याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मात्र, मी आता नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले.

मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशाबाबत बाळासाहेब थोरात यांच्याकडून माझ्यावर निशाणा साधला जात आहे. मात्र, बाळासाहेबांनी मला सांगू नये. थोरात हायकमांडपेक्षा मोठे समजतात का?, असा सवाल विखे-पाटील यांनी यावेळी केला. सुजय विखे यांच्याबाबत विचारले असता त्यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे सांगितले. तसेच महाराष्ट्रात पवारांच्या मनात विखेंबाबत अद्यापही प्रचंड द्वेष आहे, असेही ते म्हणाले.

...तर प्रचारात उतरणार

प्रचाराची पद्धत ठरवली जाणार आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या निर्णयानुसार प्रचाराची दिशा ठरवणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले. 

Web Title: Will not campaign for NCP says Radhakrishna Vikhe Patil