Loksabha 2019 : शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नासाठी काम करणार : सुप्रिया सुळे

Loksabha 2019 : शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नासाठी काम करणार : सुप्रिया सुळे

बारामती शहर : इतर कोणत्याही मुद्यांपेक्षाही युवकांच्या हाताला काम व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव या दोन मुद्यांवर पुढील पाच वर्षांत मी काम करणार आहे, असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

आज बारामतीत विविध ठिकाणी आयोजित प्रचारसभेतून बोलताना त्यांनी या मुद्यांवर भर दिला. पुढील पाच वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघ अॅनिमियामुक्त करण्याचे काम करण्याची घोषणाही त्यांनी केली. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या पाच वर्षांत सरकारने समाजाच्या प्रत्येक घटकाला फक्त फसविण्याचेच काम केले. 15 लाख खात्यात जमा करतो. शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देतो, पुन्हा दोन हजारांची घोषणा, कर्जमाफी करतो, अशा अनेक फसव्या घोषणा करत सर्वांचीच चेष्टा केली.

नोटाबंदीने देशातील मंदी वाढली

मोदी, शहा व फडणवीस यांच्या व्यतिरिक्त कोणाचे भले झालं नाही. उलट देशातील मंदी वाढली व बेरोजगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देणे व युवकांच्या हाताला काम देण्याचे काम काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांकडून निश्चित केले जाईल. संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर यांच्यासह काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. 

पवार कुटुंबियांबाबतचा प्रश्न हास्यास्पद

पवार कुटुंबियांनी गेल्या पन्नास वर्षात बारामतीत काय केले असा प्रश्न विरोधक जेव्हा करतात तेव्हा सर्वांनाच हे हास्यास्पद वाटते. बारामतीच्या विकासाच्या साक्षीदारांना हा विकास कोणी केला याची व्यवस्थित माहिती आहे. निवडणुका नसताना तोंड भरुन बारामती पॅटर्नचे कौतुक करणाऱ्यांना निवडणुका आल्यावर मात्र तोच विकास दिसत नाही, हे दुर्देवी आहे, असे सुळे म्हणाल्या. 

हे कसले चौकीदार

ज्यांना राफेलची कागदपत्रे नीट ठेवता आली नाही. ते कसले देशाचे चौकीदार, असा सवाल करत सुळे यांनी मोदींवर टीका केली. विरोधक निवडणुकीच्या निमित्ताने बारामतीत येतील. त्यांचे व्यवस्थित स्वागत व आदरातिथ्य करा. मात्र, ऐकावे जनाचे, करावे मनाचे हे आपले वाक्य बारामतीकर कधीच विसरत नाही हेही त्यांना दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

...त्यांचेही डोळे उघडले

राजू शेट्टी किंवा अरविंद केजरीवाल यांनाही भाजप सरकारचा खरा चेहरा दिसल्यामुळेच ते आज कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत आल्याचे सांगत पहिल्यांदाच त्यांचा उल्लेख सुळे यांनी आपले राजू शेट्टी असा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com