सुधागड तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचा लपंडाव

अमित गवळे 
मंगळवार, 17 जुलै 2018

पालीतील विजवितरण कार्यालयाला घेराव घातला अाणि त्यांनी विजवितरण अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले. सात दिवसांत विजपुरवठा सुरळीत न झाल्यास मंगळवारी (ता. २४) आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

पाली (जि. रायगड) - सुधागड तालुक्यातील नेणवली, पिंपळोली, नागाव, सावंतवाडी, खरसांबळे गावच्या महिला व ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 17) पालीतील विजवितरण कार्यालयाला घेराव घातला अाणि त्यांनी विजवितरण अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरले. सात दिवसांत विजपुरवठा सुरळीत न झाल्यास मंगळवारी (ता. २४) आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. पावसाळ्यापुर्वी विजवितरण अखत्यारीत असलेली महत्वाची कामे वेळेत पुर्ण न झाल्याने जनतेला विजसमस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच धोकादायक विद्दुत वाहिण्या व विजेचे खांब धोकादायक झाले आहेत. विजपुरवठा खंडीत होत असल्याने व्यवसाईक तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.पावसाळ्यामुळे सरपटणारे प्राणी, साप, विंचू व किटक काळोखात दिसत नाहीत. तसेच डास व मच्छरांच्या उपद्रवाने नागरीकांचा दिव व आरोग्य धोक्यात अाले आहे.

यावेळी पाली पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, नेणवली उपसरपंच बाळाराम चव्हाण, ग्रा. स. संदीप कोंडे, ग्रा. स. विजय धानुधरे, रमाकांत धानुधरे, महेंद्र पडवळ, गणेश कोंडे, विठ्ठल मगर, अरुण मगर, गोपीनाथ जाधव, तुकाराम पवार, दर्शना कोंडे, मंगला गोळे, सोनिबाई जगताप, निलीमा जगताप, कुंदन गोळे, रंजना कोंडे, शंकर वरगडे, सुनिता मगर, सुनिता चव्हाण, कुशा मगर, शंकर जगताप, रमेश जगताप आदिंसह महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे.विजपुरवठा खंडीत झाला तर नागरीकांपुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात व येणार्‍या सणासुदीत विजपुरवठा कायम सुरळीत राहावा या दृष्टीकोणातून विजवितरण विभागाने अधिक दक्षता घेवून योग्य ती उपाययोजना करावी. - साक्षी दिघे, सभापती, पंचायत समिती, पाली-सुधागड

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the supply of electricity does not go smoothly then villager warned of fasting at pali raigad