गुहागर : भास्कर जाधवांची आघाडी |Election Results 2019

गुहागर : भास्कर जाधवांची आघाडी |Election Results 2019

रत्नागिरी : गुहागर विधानसभा मतदारसंघात अकराव्या फेरीत शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी बाजी मारली आहे. जाधव यांना 37708 एवढी मते होती. तर
राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर 26360 यांना दुसऱया क्रमांकाची मते मिळाली.
रत्नागिरी : चिपळूण विधानसभा मतदारसंघात 18 व्या फेरीत शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांना 56560 मते, तर राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांना 78376 
मते मिळाली. निकम यांनी 21816 मतांची आघाडी मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये चौदाव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना 64989 मते, तर राष्ट्रवादीच्या
सुदेश मयेकर यांना 16350 मते मिळाली. सामंत ४८६३९ मतांनी आघाडी घेतली आहे. 
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाराव्या फेरी शिवसेनेच्या उदय सामंत यांनी 46790 मतांनी आघाडी घेतली आहेत. दापोली मतदारसंघात 
शिवसेनेचे योगेश कदम सातव्या फेरीत 5086 मतांनी आघाडीवर आहेत. 
नवव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना ५१८६ मते, तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांना ८५३ मते आहेत.
या फेरीअखेर सामंत ३५४०८ मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांना २७८५९, तर राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांना ४१४१ एवढी मते
मिळाली. सामंत यांनी २३६०८ मतांची आघाडी घेतली आहे. गुहागरमध्ये चौथ्या फेरीत  शिवसेनेचे भास्कर जाधव यांना 12497 मते, राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांना 10586 मते आहेत. चौथ्या फेरीअखेर भास्कर जाधव 1911 मतांनी आघाडीवर आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघात तिसऱया फेरीत मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी 2244 मतांची आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या कदम यांना
10032 मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना 7788 एवढी मते मिळाली आहेत. 
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चौथ्या फेऱीअखेर उदय सामंत १५५९९ मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या पोस्टल फेरीत शिवसेनेचे उदय सामंत 2726 मतांनी
आघाडीवर आहेत. त्यांना 3464 मते तर राष्ट्रवादीचे
 सुदेश मयेकर यांना 764 मते मिळाली आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com