आज कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

मुंबई : अरबी समुद्रातील "महा' चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे बुधवारी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा वगळता संपूर्ण कोकणात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गुरुवारीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. 

चक्रीवादळ 7 नोव्हेंबरच्या सकाळी दिव ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंतच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्‍यता आहे. या वादळाचा पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला असून गुरुवारपर्यंत तो खवळलेलाच राहणार आहे.  
 
web title : rains will hit Konkan today

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rains in Konkan today