रत्नागिरी, रायगडमध्ये भूमिगत वीज जोडणीसाठी २०० कोटींचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - चक्रीवादळप्रवण क्षेत्रातील रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत समुद्र किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीजजोडणी देण्यासाठी २०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याही समावेशाबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवू, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.

अलिबाग तालुक्‍यातील नवेदर नवेगाव ग्रामपंचायत हद्दीतील महावितरण कंपनीच्या एलटी वायर जीर्ण झाल्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, की हे काम कंत्राटदाराकडून केले जात नाही. त्याला अजून २० दिवसांची मुदत देऊनही काम सुरू न झाल्यास त्याच्याकडून काम काढून घेण्यात येईल. राज्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत राज्यातील सर्व कामे २०१९ पर्यंत पूर्ण केली जातील. राज्यात ३० वर्षांपूर्वीच्या वीजवाहिन्या, खांबांची दुरुस्ती तसेच आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटींची आवश्‍यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार आहे. या वेळी चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, वैभव नाईक यांनी भाग घेतला.

Web Title: Ratnagiri News 200 crores for underground power connection