#MarathaKrantiMorcha मराठा समाजाला आरक्षण द्या - खडसे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 August 2018

मुक्ताईनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे, असे सांगणारा सत्ताधारी गटातील मी पहिला आमदार असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिली. खडसे यांच्या फार्म हाउससमोर आज सकल मराठा समाजाने दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर निवेदन दिले. त्या वेळी खडसे बोलत होते. मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

खडसे म्हणाले, 'पंढरपूर वारीदरम्यान मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे,असे मी सांगितले होते. त्या निर्णयावर मी ठाम असून मराठा समाजाच्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे;परंतु हिंसक आंदोलन किंवा आत्महत्या करणे याचा पर्याय नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha reservation agitation eknath khadse