#MarathaKrantiMorcha हीना गावित हल्ला प्रकरणाचा निषेध

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 7 August 2018

मुंबई - भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही, ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चितच निंदनीय असून, यामागे हेतुपरस्पर गावित यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असे क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

मुंबई - भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही, ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चितच निंदनीय असून, यामागे हेतुपरस्पर गावित यांना लक्ष्य करण्याचा हेतू नव्हता, असे क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनाने रविवारी जिल्हा नियोजनाची बैठक होती. बैठकीनंतर लोकप्रतिनिधी मोर्चेकऱ्यांना सामोरे जातील, अशी आशा होती. पण, गावित यांना मागच्या दरवाजातून पोलिसांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना कोण जाणार आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसले व गाडीवर चढले. ज्या वेळी गाडीमध्ये खासदार गावित आहेत हे लक्षात आले त्याक्षणी अनेकांनी शांततेचे आवाहन करत, गावित यांना सुरक्षित बाहेर काढले. तिथल्या समन्वयकांनी गावित यांची माफी मागितली.

‘हल्ल्याच्या वेळी पोलिस निष्क्रिय’
नवी दिल्ली - खासदार हीना गावित यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित झाला. ‘आदिवासी महिलेवर हा हल्ला होत असताना पोलिसांनी निष्क्रियता दाखविली,’ अशा संतप्त शब्दांत हीना गावित यांनी नाराजीला वाट करून देत दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि पोलिस अधीक्षकांना निलंबित केले जावे, अशी मागणी केली.

पडसाद आंदोलनाचे
बीड

    बीडमध्ये महिलांचा मोर्चा; युवतींचा मोठा सहभाग
    परळीत ठिय्या आंदोलनाचा विसावा दिवस
    सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी परळीत
    माजलगावमध्ये ठिय्याचा सहावा, तर गेवराई, केजमध्ये चौथा दिवस

लातूर 
    मराठा आंदोलनास राजपूत करणी सेनेचा पाठिंबा
    करजगाव - फत्तेपूर पाटीवर रास्ता रोको
    आमदार विनायक पाटील यांच्या घरासमोर घंटानाद

परभणी
    पाथरीत विद्यार्थ्यांचा मोर्चा, तहसील कार्यालयात ठिय्या
    सेलू, मानवत, जिंतूर, सोनपेठ येथे ठिय्या

हिंगोली
    हिंगोली, वसमत, सेनगाव येथे ठिय्या सुरूच
    नर्सी नामदेव येथे रास्ता रोको, सिरसम बुद्रुक येथे बंद, रास्ता रोको
    गोरेगाव येथे महिलांचे पोलिसांना निवेदन
    वसमत येथे वीरशैव वाणी समाज संघटनेचा, तर हिंगोलीत औषधी विक्रेता संघटनेचा मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा
    हिंगोलीत सकल धनगर समाजातर्फे धरणे

औरंगाबाद 
    औरंगाबाद- जालना मार्गावरील कुंभेफल फाटा येथे रास्ता रोको


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha reservation Protest of the case of Heena Gavit Attack