Vidhansabha 2019 : अखेर एमआयएमचं ठरलं, वंचितशी काडीमोडच

शेखलाल शेख
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

औरंगाबाद - एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या काडीमोडवर अखेर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी जे वक्‍तव्य केले आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असे स्वतः पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (ता. 10) हैदराबादेत स्पष्ट केले. शिवाय आता असुद्दीन ओवेसी हे प्रकाश आंबेडकरांशी आघाडीसाठी बोलणार नाही हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. 

औरंगाबाद - एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या काडीमोडवर अखेर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी जे वक्‍तव्य केले आहे ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे, असे स्वतः पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी (ता. 10) हैदराबादेत स्पष्ट केले. शिवाय आता असुद्दीन ओवेसी हे प्रकाश आंबेडकरांशी आघाडीसाठी बोलणार नाही हेसुद्धा स्पष्ट झाले आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी "वंचित'ने एमआयएमला 288 पैकी आठपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याने आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असून, बोलणी फिस्टकल्याचे प्रसिद्धिपत्रक एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज यांनी काढले होते. यानंतर वंचितकडूनसुद्धा पत्रक काढण्यात आले. ओवेसी हे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ते जोपर्यंत स्वतः जाहीर करीत नाही तापेर्यंत आमची एमआयएमशी आघाडी राहील, असे सांगत खासदार इम्तियाज यांचे विधान प्रकाश आंबेडकर यांनी नाकारले होते. यावरून राज्यात गोंधळाचे वातावरण असताना असदद्दुीन ओवेसी यांनी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत या बाबतचा मोठा खुलासा केला आहे. 
 
लोकसभेत दिला होता मोठा धक्का
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत 41 लाख मते घेत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपला राज्यात मोठा धक्का दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही वंचित आणि एमआयएम एकत्र निवडणूका लढवतील असे बोलेले जात होते.  एमआयएमने दिलेला 74 जागांचा प्रस्ताव फेटाळत वंचितचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना केवळ आठ जागा देण्याची तयारी दर्शवली. शिवाय आपली चर्चा थेट ओवेसी यांच्याशी सुरू आहे, आपण इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करणार नाही असे अप्रत्यक्षपणे सांगत प्रकाश आंबडेकरांनी खळबळ उडवून दिली होती. 
 

आमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित सोबतची आघाडी तुटली असली तरी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यांबद्दल जो आदर माझ्या व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तो यापुढेदेखील कायम राहील, तो तसूभरही कमी होणार नाही. 
- खासदार इम्तियाज जलील 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: इम्तियाज जलील यांचे विधान हीच पक्षाची अधिकृत भूमिका : ओवेसी