सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात केला बदल 

संदीप लांडगे
शनिवार, 13 जुलै 2019

 इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यासंदर्भात "सकाळ'ने गुरुवारी (ता. चार) वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत "बालभारती'तर्फे इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात बदल करून आदरयुक्त भाषेत लिखाण केले आहे. 

औरंगाबाद - इयत्ता सातवीच्या पुस्तकात महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकात बदल करून महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यासंदर्भात "सकाळ'ने गुरुवारी (ता. चार) वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत "बालभारती'तर्फे इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात बदल करून आदरयुक्त भाषेत लिखाण केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे इयत्ता सातवीच्या इतिहासातील पुस्तकात मेवाडचे महाराणा प्रतापसिंह यांचा एकेरी अवमानजनक उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे समस्त राजपूत समाजच नव्हे तर राष्ट्रप्रेमी सर्व समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. निकोप समाजजीवनाच्या दृष्टीने सदर बाब योग्य नाही. त्यामुळे तत्काळ या पुस्तकात बदल करून वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करावीत, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती.

याबाबत बालभारतीकडून इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात आदरयुक्त भाषेत लिखाण करण्यात आले आहे. तसेच पुस्तकात बदल केल्याचे शुद्धिपत्रक पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक शकुंतला काळे यांनी जारी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes made in history book