सोन्याच्या ताटातून केळीच्या पानावर... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

नांदेड - जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणूक प्रचारादरम्यान पक्ष कार्यकर्त्याच्या घरी सोनेरी ताटात भोजन घेतल्याने टीकेचे धनी झालेल्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी (ता. नऊ) चक्क केळीच्या पानावर भोजनाचा आस्वाद घेतला आणि टीकेपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. सरसम (बु., ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील ऍड. अतुल वानखेडे यांच्या घरी या दोघांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. 

कॉंग्रेसच्या प्रचाराची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूरपासून नुकतीच झाली. त्या वेळी तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या घरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, सुशीलकुमार शिंदे यांनी भोजन घेतले. त्यासाठी नांदेडच्या केटरर्सचा मेनू होता. नेत्यांच्या भोजनासाठी त्याने वापरलेली ताटे ही सोन्याची होती, अशी आवई उठली होती. त्यामुळे स्पष्टीकरण देताना कॉंग्रेसची धांदल उडाली होती. ताट-वाट्या पितळेच्या होत्या. त्यांना सोन्याचा मुलामाही दिलेला नव्हता, तर केवळ रंग सोनेरी होता, असे स्पष्टीकरण यजमान व तेथील उपसरपंच सागर उटगे यांनी दिल्यावर ताट-वाट्यांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर श्री. चव्हाण यांनीही खुलासा करून यासंदर्भात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात टीकेची झोड सुरू होती. ऐन निवडणुकीच्या रंगात विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले व त्यांनी "सोन्याच्या ताटात जेवले' असे प्रचारादरम्यान सांगायला सुरवातही केली. काही विरोधकांनी अजूनही हा मुद्दा सोडलेला नाही. त्या टीकेपासून बोध घेण्याचे किंवा टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न सरसम येथे झाला. तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्याने आयोजित केलेल्या स्नेहभोजनात केळीची पाने वापरली होती. श्री. चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, तालुकाध्यक्ष विकास पाटील आदींसह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भोजनाचा आनंद घेतला. सुनील वानखेडे, जनार्दन ताडेवाड, नगराध्यक्ष अ. अखिल अ. हमीद, जोगेंद्र नरवाडे, संजय माने, दिलीप राठोड, रफिक सेठ, गजानन सूर्यवंशी, भागवत देवसरकर, आबाराव पाटील, शिवकुमार गांजरे, साईनाथ शिंदे, सखाराम मंडलवाड, वामन मोरे, उत्तम गायकवाड आदींसह सरसम येथील कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थिती होते. या कृतीतून नेत्यांनी विरोधकांना चोख उत्तर दिल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली असली, तरी केळीच्या पानावरील भोजनाचा लाभ पक्षाच्या उमेदवाराला होतो किंवा कसे, हे आगामी काळात कळणार आहेच.

Web Title: congress leader Eat the food on a banana leaf