कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे 16 आमदार संपर्कात, रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट 

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे

औरंगाबाद - कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी 16 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता.17) येथे केला. 

चिकलठाण्यात झालेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह औरंगाबाद तालुक्‍यातील सरपंच, उपसरपंचासह काही कार्यकर्त्यांनी श्री. दानवे व श्री. बागडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी श्री. दानवे म्हणाले, की विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे आणखी 16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांग लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचार घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

पक्षात इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कुणी आले तरी आपले काम सुरूच ठेवायचे असते. एक ना एक दिवस तुम्हाला नक्‍कीच न्याय मिळतो, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे कलम रद्द करण्यात आल्याने देशभरात भाजपबाबत विश्‍वासाची भावना निर्माण झाली असून, त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूकदेखील कॉंग्रेसच्या हातून गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com