देशातील पहिला स्टीलचा जलतरण तलाव औरंगाबादेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावाची उभारणी औरंगाबादेत करण्यात येणार आहे. भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये सुमारे दहा कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण ओझोन पद्धतीने होणार आहे. 

औरंगाबाद - देशातील पहिल्या स्टेनलेस स्टील जलतरण तलावाची उभारणी औरंगाबादेत करण्यात येणार आहे. भारतीय खेळ प्राधिकरणमध्ये सुमारे दहा कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या या तलावातील पाण्याचे शुद्धीकरण ओझोन पद्धतीने होणार आहे. 
भारतीय खेळ प्राधिकणातर्फे औरंगाबादेत असलेल्या पश्‍चिमी प्रशिक्षण केंद्रात जलतरण तलावाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या तलावाच्या उभारणीसाठी आता जुन्या कॉंक्रिटच्या पद्धतीचा वापर करण्यात येणार नाही. त्यासाठी स्टेनलेस स्टील आणि बोल्ट सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. ऑलिंपिक दर्जाचा हा पूल देशातील पहिला स्टेनलेस स्टीलचा पूल ठरणार आहे. पूल तयार करण्यासाठी कॉंक्रिटचा वापर करण्यात येणार नाही. त्यामुळे या तलावातून होणारी पाण्याची गळतीही नगण्य राहणार आहे. बाष्पीभवनच्या माध्यमातून होणारी पाण्याची घट केवळ भरून काढावी लागणार असल्याची माहिती भारतीय खेळ प्राधिकरणाच्या औरंगाबाद केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. 

ओझोन फिल्टरेशनने होणार पाणी स्वच्छ 
पारंपरिक पद्धतीचे फिल्टिरेशन प्लांट बाद करून या जलतरण तलावात आधुनिक ओझोन पद्धीने पाण्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्लिचींग पावडरची गरज राहणार नसून ओझोन जनरेटरच्या मदतीने हा पूल तयार करण्यात येणार आहे. या पूलाच्या एका बाजूने पाणी ओझोन फिल्टरेशन प्लांटकडे जाते. पंपाच्या मदतीने हे पाणी एका फिल्टरमध्ये नेले जाणार असून त्यात कचरा आणि अन्य वस्तू अडकतील. त्यातून हे पाणी पुढे सरकल्यावर ओझोन जनरेटरकडे जाणार आहे. त्यातून हे पाणी स्वच्छ होत पुन्हा तलावात येणार आहे. 

संपूर्ण पुलावर छत, जिमचीही सोय 
जलतरण तलावावर पूर्णपणे बंदिस्त छत राहणार आहे. त्यामुळे येथे दिवसभर सराव करणे शक्‍य होणार आहे. ऑलिंपिकच्या मोजमापासह तयार होणाऱ्या या पूलमध्ये परिसरातून धूळ येण्याचे काम शिल्लक राहणार नाही. याशिवाय येथे जिमची सोयही करण्यात आली असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार असणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृह आणि शॉवर येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्पर्धा लक्षात घेता येथे रेफ्री आणि प्रशिक्षकांच्या बसण्याची स्वतंत्र सोय करण्यात येणार आहे. 

Web Title: The country's first steel Swimming Pool in aurangabad