लेकराबाळांची काळजी करा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

औरंगाबाद - डॉक्‍टर म्हटले की विशिष्ट पेहराव, भाषाशैली असे गुण दिसतात; पण नावापुरताच डॉक्‍टर असलेला ‘कळ्यांचा मारेकरी’ डॉ. सुदाम मुंडे हा एखाद्या व्हिलनला लाजवेल अशा खास शैलीत प्रकरणाच्या चौकशीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी द्यायचा. ‘लेकराबाळांची काळजी करा; गुपचूप निघून जा’, अशी त्याची धमकी असे. तपासणीसाठी गेलेल्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्या पथकाला याचा प्रत्यय आला होता. एवढेच नव्हे, तर एकदा त्यांच्यासह उपसंचालकांना कोंडण्याचा प्रयत्न केल्याची घटनाही घडली होती. त्याची शासकीय दफ्तरात नोंदही आहे. 

परळी बस स्थानकासमोरील डॉ. सुदाम मुंडेच्या ‘डॉ. मुंडे स्त्री रुग्णालया’त २००५ मध्ये गर्भलिंगनिदान होत असल्याचे समोर आले होते. बड्या राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याने सर्व यंत्रणा खिशात असल्याचा त्याचा कायम आविर्भाव असायचा. त्यामुळे त्याची ‘मॅनेज’ करण्याची पद्धत किंवा त्याची दहशत यामुळे त्याच्या दवाखान्याची तपासणी करण्याचे धाडस कोणी करत नसे. तरीही तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी हे धाडस केले होते. अर्थात, त्यांनाही त्याच्या धमकीचा अनुभव घ्यावा लागला होता. त्या २०११ मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झाल्या. प्रथम त्या पथकासह मुंडेच्या दवाखान्याच्या तपासणीसाठी परळीत गेल्या. डॉ. वसिष्ठ जाधव त्यांच्यासोबत होते. डॉ. राठोड व त्यांच्या टीमने सर्व माहिती संकलित करून त्याचे केबिन गाठले. त्या वेळी त्याने त्याच्या खास शैलीत ‘या मॅडम, चहा घेऊन जा’, असे वाक्‍य उच्चारले. सोनोग्राफीचे फॉर्म, रजिस्टर आदी नोंदी नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर ‘मॅडम, इथे एक पोलिस निरीक्षक माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या घरी माझी माणसे गेली आणि त्याच्या बायकोला सांगितले, ‘लेकराबाळांची काळजी असेल तर गुपचूप बसा आणि परळी सोडा.’ त्यानंतर तो बिचारा शांत राहिला आणि निघून गेला. तसे करा,’ अशी त्याने धमकी दिली होती.

गुंडांचा ताफा
डॉ. सुदाम मुंडेने दवाखान्यात प्रवेश केल्यापासून घरी जाईपर्यंत त्याच्या अवतीभोवती गुंडांचा ताफा असायचा. कोणी चौकशीसाठी आल्यानंतर ही गुंडमंडळी अधिकाऱ्यांना गराडा घालून अप्रत्यक्ष इशारे करून धमक्‍या द्यायची. डॉ. राठोड व डॉ. अश्‍फाक यांचे पथक गेल्यानंतर तेथे ‘सीरियस पेशंट आला आहे, डॉक्‍टरला उपचार करू द्या. रुग्णाचा जीव गेला तर तुम्ही जबाबदार राहाल का,’ असे म्हणत सात-आठ जणांचा घोळका त्यांच्या अंगावर धावला. याची दफ्तरात नोंद आहे. 

Web Title: Dr. Sudam Munde aurangabad news