देशात केंव्हाही आणीबाणी लादल्या जाईल - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

कोणीही २०१९ च्या विधानसभेचे गणित मांडू नका. देशवर केव्हाही आणिबाणी लादली जाऊ शकते, असे सांगत कामाला लागण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. 'पालिका, विधानसभा ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकीला प्रामाणिकपणाने सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.लोहा येथील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

लोहा- कोणीही २०१९ च्या विधानसभेचे गणित मांडू नका. देशवर केव्हाही आणिबाणी लादली जाऊ शकते, असे सांगत कामाला लागण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. 'पालिका, विधानसभा ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकीला प्रामाणिकपणाने सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.लोहा येथील माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. 

आमदार डी. पी. सावंत, अमरनाथ राजुरकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, डॉ. श्याम तेलंग, माधवराव पांडागळे, कल्याण सूर्यवंशी, शिवाजी आंबेकर, सचिन रहाटकर, सोनु संगेवार, अजमोद्दीन शेख, पंकज परिहार, सरफोद्दीन शेख, शेषराव कहाळेकर, तालुकाध्यक्ष  रंगनाथ भुजबळ, अनिल दाढेल, रामकिशन पारेकर, राजेश पारेकर, बाबूराव डोम आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राजकिय स्थितीचा खरपुस समाचार घेत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  म्हणाले, 'देशातील पंधरा-सोळा राज्यातील निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये घेण्याचे नाकारता येत नाही. मोदी सरकार दुटप्पीपणाने वागत असुन राष्ट्रपती राजवट आणुन लोकप्रियता आणि निवडणुका अशी दुहेरी  निती अवलंबु पहात आहे. प्रारंभी लोहा पालिका निवडणुका होत असल्या तरी आपणास सजग रहावे लागणार आहे.

आमदार अमरनाथ राजुरकर यांच्या निधीतून शहर विकासाकरिता ४० लाख रूपये देण्याचे  यावेळी मान्य करण्यात आले. लोहा निवडणुक ही विधानसभा निवडणुकीसाठी पोषक ठरेल अशा भ्रमात राहू नका. लोहा-कंधार मध्ये दूर्दैवाने सलग दहा वर्षापासून दारू, पैसा आणि दमदाटी चालत आहे. क्षणभरात विचार व तत्व सोडायला लावणारे प्रलोभनं दाखवली जातात. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणा अंगीकारत दोन्ही तालुके व ग्रामीण भागात संपर्क ठेवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी तिहेरी संकटात...
आज घडीला शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. कर्जमाफीचे ३३ हजार कोटीपैकी केवळ दहा-बारा हजार कोटी प्रत्यक्षात मिळाले आहे. शेतीमालाला अधारभूत किंमत नाही. पीककर्ज मिळत नाही. थकबाकीदारांची संख्या वाढते आहे. नव्याने कर्ज मिळत नाही. शेतीसल्लागार तयार होऊ दिले नाहित. शेतकरी महिलेला कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणारे चलवादे वाढले? कुणाच्या जोरावर ही सगळे नाटकं? या घटनांचा जाहिर निषेध मी करतो. व्यापारी त्रस्त आहेत. बेरोजगारी वाढली आहे. तरूण पिढीला नागवले आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

तत्वशुन्य व कपड्यांसारखे पक्षबदलु लोकप्रतिनिधी...
लोहा मतदारसंघात स्वाभिमान राहिला नाही. मुलभूत प्रश्न तसेच राहिले. ‘सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता‘ हे समिकरण झाले आहे. तत्वशुन्य व कपड्यांसारखे पक्षबदलु लोकप्रतिनिधी तयार होत असल्याची टिका प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता चव्हाण यांनी केली.

Web Title: Emergency will be imposed in the country anytime says Ashok Chavan