Vidhan Sabha Election 2019 : 'वंचित'-एमआयएमची आघाडी तुटली

शेखलाल शेख
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

वंचित आघाडीने 288 पैकी फक्त आठ जागा एमआयएमला सोडणार असल्याचे सांगितले होते.

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्यात बोलणी फिसकटल्याने दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहेत, अशी माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी 'सकाळ'ला सांगितले.

महाराष्ट्रात एमआयएमला हव्या होत्या एवढ्या जागा

मागील दोन महिन्यांपासून वंचित आघाडी आणि एमआयएममध्ये जागा वाटपासाठी चर्चा सुरू होती. मात्र, वंचित आघाडीने 288 पैकी फक्त आठ जागा एमआयएमला सोडणार असल्याचे सांगितले होते.

पुण्यात हव्या होत्या एमआयएमला 'या' तीन जागा

मागील दोन महिन्यात झालेल्या बैठकांमधून कोणताही तोडगा न निघाल्याने दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची अधिकृत घोषणा आज (ता. सहा) इम्तियाज जलील यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: letest news about Vanchin Bahujan AAghadi & MIM