जनतेला मी महाराष्ट्रात हवा होतो - पहा कोण म्हणतंय... । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

जनतेला मी महाराष्ट्रात हवा होतो. भोकरमध्ये द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली आहे.

भोकर (जि. नांदेड) - लोकसभेत ज्या विधानसभा मतदारसंघातून केवळ पाच हजार चे मताधिक्य मिळाले व माझा लोकसभेत पराभव झाला. त्याच भोकर मतदारसंघातून जवळजवळ एक लाख मताधिक्यानी जनतेने मला निवडून दिले या वरून जनतेला मी महाराष्ट्रात हवा होतो अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथे दिली. ते पुढे म्हणाले की भोकरमध्ये द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनी चपराक दिली आहे.

क्लिक करा - या कारणांनी जिंकले मुंडे, हरल्या मुंडे

भोकरच्या मतदारांनी २००९ च्या पुनर्रावृती केली आहे.भोकर मतदार संघातील जनता व माझे नाते अतुट असे आहे. निवडनूकीत विकासाची जी जी आश्वासने दिली होती ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पाच वर्षात मराठवाडा, नांदेड या सह भोकरच्या विकासाकडे आपले विशेष लक्ष असेल असे सांगतानाच मतदार संघातील जनता व काँग्रेस कार्यकर्ते यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.

नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जरी चार जागा मिळाल्या असल्या तरी हे यश अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे सांगताना नांदेड दक्षिण ची जागा आल्याचा आनंद झाला पण उत्तर ची जागा केवळ मतविभाजनामुळे गमावल्याचे आपणास दुःख असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या जागा कमी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेच्या प्रक्रीयेत कांहिही घडू शकते याचे सुतोवाच त्यांनी या वेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Bhokar Nanded final result Congress Ashok Chavhan