मराठवाड्याला प्रतीक्षा दमदार पावसाची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज मराठवाड्याबाबत पुरता खोटा ठरला. ऑगस्टचा पहिला आठवडा संपत आला तरीही मराठवाड्यात काही मंडळे सोडता संपूर्ण भाग कोरडा आहे

औरंगाबाद - यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज मराठवाड्याबाबत पुरता खोटा ठरला. ऑगस्टचा पहिला आठवडा संपत आला तरीही मराठवाड्यात काही मंडळे सोडता संपूर्ण भाग कोरडा आहे. विभागात आजपर्यंत (रविवार) ३६९.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस आतापर्यंत  झाला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील काही मंडळे, नांदेड जिल्ह्यातील किनवट, बोधडी, वानोळा आणि तळणी येथे अतिवृष्टी झाली. यात वानोळा येथे १९१ टक्‍के पाऊस झाला आहे. असे असले तरी अद्यापही मराठवाडा कोरडा आहे. अनेक ठिकाणी नुसती भुरभुर सुरू आहे. रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात ०.३४ मिलिमीटर पाऊस झाला. जालन्यात ०.२५ मिमी, परभणी ५.२३ मिमी, हिंगोली २६.८२ मिमी, नांदेड २९.९७ मिमी, बीड ०.७९ मिमी, लातूर ८.१० मिमी, उस्मानाबाद  ४.२८ मिमी म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात ९.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada region waiting rain