Vidhansabha 2019 : एमआयएमची पहिली यादी जाहीर, हे आहेत उमेदवार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.10) औरंगाबादेत मराठवाड्यातील नांदेड, नाशिक जिल्ह्यांतील मालेगाव आणि पुण्याजवळील वडगावशेरी या मतदारसंघातील 21 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या तीनही मतदरासंघांतील उमेदवारांची पहिली यादीदेखील प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जारी केली आहे. 

त्यानुसार नांदेड उत्तर मतदारसंघातून मोहंमद फेरोज लाला, मालेगाव मध्यमधून माजी आमदार मुफ्ती महंमद इस्माईल अब्दुल खालिक, तर वडगावशेरी (पुणे) येथून डॅनियल रमेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील इतर मतदारसंघांतील इच्छुकांच्या जिल्हानिहाय मुलाखतींचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

मंगळवारी शहरातील पक्षाच्या मुख्यालयात इम्तियाज जलील यांनी नांदेडमधील 15, पुणे दोन, तर नाशिक येथील चार अशा एकूण 21 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एमआयएमकडे राज्यातील 125 मतदारसंघांतून तीनशेहून अधिक इच्छुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र दलित, मुस्लिम आणि ओबीसीबहुल जागांवरच एमआयएमने लक्ष केंद्रित केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com