महाराष्ट्रानंतर "एमआयएम'चे लक्ष उत्तर प्रदेशकडे 

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - महाराष्ट्रातील महापालिका, विधानसभा निवडणुकीत यश मिळविल्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. मुस्लिम समाजाची 18.5 टक्के लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात 405 विधानसभा जागांपैकी 143 जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत, त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सभा, रॅली केल्या आहेत. 

 तेलंगणमध्ये "एमआयएम'ची मोठी शक्ती आहे. त्यानंतर महाराष्ट्रात या पक्षाची ताकद मानली जाते. आता त्यांनी महाराष्ट्रातील यश डोळ्यांसमोर ठेवून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. येथील 70 जागांवर 20 ते 30 टक्के मुस्लिम मतदार आहेत, तर 73 जागांवर मुस्लिम मतदार 30 टक्के आहेत. उत्तर प्रदेशातील रुहेलखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेशात मुस्लिम समाज निर्णायक संख्येत असल्याने येथे "एमआयएम'ने जोर दिला आहे. ओवेसी यांनी उत्तर प्रदेशातील चार मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघांत सभा, रोड शो केला आहे. प्रत्येक ठिकाणी ओवेसी हे तेलंगण, हैदराबाद महापालिका, महाराष्ट्रातील नांदेड, औरंगाबाद महापालिकेचे उदाहरण देतात. ओवेसींचे मुस्लिम समाजासोबत दलित समाजाला तिकीट देण्याचे धोरण असल्याने त्यांना आत्तापासून प्रतिसाद मिळण्यास सुरवात झालेली आहे. 

आकड्यांचे गणित 
महाराष्ट्रात 11 टक्‍क्‍यांच्या जवळपास मुस्लिमांची संख्या आहे, त्यामुळे महाराष्ट्रात ओवेसी यांनी पाय ठेवला. आता उत्तर प्रदेशात 18.5 टक्के मुस्लिम लोकसंख्या असल्याने त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. उत्तर प्रदेशातील पश्‍चिम भागात 27.5 टक्के मुस्लिम आहेत. उत्तर प्रदेशात 2007 मध्ये 56, तर 2012 च्या निवडणुकीत 69 मुस्लिम आमदार निवडून आले होते. याशिवाय दलित मतांची संख्याही निर्णायक असल्याने महाराष्ट्राप्रमाणे ओवेसी यांनी यूपीमध्ये दलित-मुस्लिम मतांच्या आकड्यांचे गणित जुळवण्यास सुरवात केली आहे.

Web Title: MIM attention of Uttar Pradesh