(Video) नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबे सुरू

नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग किल्ला

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय  पाणी महाल येथील नर-मादी धबधबा सोमवारी (ता.२१) दुपारी सुरू झाला. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. सोलापूर येथील युनिटी मल्टिकाँन कंपनीने किल्ल्यात मोठ्या प्रमाणात  विकासकामे केली आहेत.

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव लागते. किल्ल्यात तत्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे बांधून नदीचे पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था केली होती.

नळदुर्ग येथिल बोरी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहीत झाल्यानंतरच किल्ल्यातील सर्व धबधबे वाहतात, धरणाच्या वरील होर्टी, गंधोरा, चिकुंद्रा या भागात मोठा पाऊस झाल्यामुळे बोरी धरण (कुरणूर प्रकल्प) पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे. यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबे पाहण्यासाठी परिसरातील पर्यटक किल्ल्यात गर्दी करत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com