चिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त

अनिल जमधडे
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद  : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन किलो सोने जप्त केले, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली- औरंगाबाद या एअर इंडियाच्या विमानातुन चोरीचे सोने आणण्यात येणार असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाला मिळाली होती.

मुंबईच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चिकलठाणा विमानतळावर सापळा लावला त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता चिकलठाणा विमानतळावर विमान उतरताच सापळा लावलेल्या कस्टमच्या अधिकाऱ्यांनी संशयित प्रवाशा ची झडती घेतली. त्यावेळी, त्याच्या बॅगेत जवळपास एक कोटी रुपयांचे तीन किलो सोनं लपवलेले असल्याचे लक्षात आले. 

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे तीन किलो सोने जप्त केले. या कारवाईबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारवाई करताना केंद्रीय औद्योगिक दलाच्या कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक पोलिसांना ही माहिती देण्यात आली नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Three kilos of gold worth one crore worth of cash were seized at chikalthana Airport