बीड जिल्ह्यात दोघांनी संपविले जीवन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

बीड : 'मराठा समाजासाठी आपण आपले जीवन संपवित आहोत. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, समाजाचा अंत पाहू नये,' असा मजकूर लिहून एकाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी बीड तालुक्‍यातील बेडूकवाडी येथे उघड झाली. तर, दुसरी आत्महत्या डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) येथे घडली असून, मराठा आरक्षणासह मुलीचे लग्न आणि शिक्षणासाठीच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचा जबाब पोलिसांत नोंदविण्यात आला आहे. 

बेडूकवाडीत राहणारे शिवाजी तुकाराम काटे (वय 42) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत वरील मजकूर आढळला. डोंगरकिन्ही येथे कानिफ दत्तात्रेय येवले (वय 45) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासह मुलीचे लग्न आणि मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने विष घेतल्याचे कानिफ यांनी सांगितल्याचा जबाब त्यांचे बंधू कल्याण येवले यांनी पोलिसांत दिला आहे. दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून, कुटुंबीयांना भरीव मदत आणि एकाला नोकरीत सामावून घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे. 
 
Web Title: Two lives lost in Beed district