गोदावरीच्या पातळीत वाढ ; गिरणाला पूर येण्याची शक्‍यता 

Live Photo
Live Photo

नाशिक ः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झाल्याने धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे गोदावरीच्या नाशिकमधील रामकुंड परिसरातील पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पातळी दुतोंडी मारुतीच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत आहे. तसेच गिरणा नदीला पूर येण्याची शक्‍यता प्रशासनातर्फे वर्तवण्यात आली आहे. 

गंगापूर धरणातून 3 हजार 426, भावलीतन 382, दारणातून 7 हजार 408, नांदूरमधमेश्‍वरमधून 8 हजार 935, तर पूनंदमधून 4 हजार 532 क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या रहिवाश्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गंगापूर, दारणा, भावली, आळंदी, कश्‍यपी ही धरणे 100 टक्के भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग गोदावरी व दारणा नदीपात्रात करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थिती नागरिकांनी नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये. तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडून नये. विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू नये. पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावीत, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे सांगण्यात आले. 


पूनंद धरणातून 486 क्‍युसेस पाणी सोडण्यात येत होते. पण सततच्या पावसामुळे दुपारनंतर हा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीला पूर येण्याची शक्‍यता असल्याने ठेंगोडा, लखमापूर, दाभाडी, मालेगावच्या रहिवाश्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस, तलाठी आणि ग्रामसेवकांनी खबरदारीचे आदेश द्यावेत, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com