नातीच्या वैद्यकीय इलाजासाठी आजोबांचे मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नाशिक ः लासलगाव येथील नातीवर जीवघेणा हल्ला झाला आहे. तिला नाशिकमधील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वडिलांच्या निधनामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याने तिला मदत करावी, असे आवाहन आजोबा भालचंद्र टिळे यांनी केले आहे. 

श्री. टिळे यांच्या सख्ख्या भाचीची कन्या आहे. तिच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या प्रशासनातर्फे चार ते पाच लाखांपर्यंत वैद्यकीय खर्च येण्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्यामुळे तिला आता सामाजिक मदतीची आवश्‍यकता असल्याचे श्री. टिळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नाशिकमधील कोशागार शाखेच्या खात्यावर ही मदत जमा करता येईल. फोन पे, गुगल पे अथवा पेटीएम द्वारे बॅंक खाते क्रमांक 11291977887 यावर मदत जमा करता येईल. त्यासाठी आयएफएस कोड क्रमांक एसबीआयएन 0000437 हा आहे. संपर्कासाठी भालचंद्र टिळे यांचा भ्रमणदूरध्वनी क्रमांक ः 9423079595 अथवा 8668623834. 

लासलगाव येथील पत्रकार (कै.) नानासाहेब सुरवाडे यांच्या कन्येला वैद्यकीय इलाजासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या इलाजावरील खर्चाची रक्कम मोठी असल्याने समाजातून मदत व्हावी, अशी आमची विनंती आहे.
- भालचंद्र टिळे (आजोबा) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Medical