कंबोडियात विश्‍व मराठी साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

कंबोडिया ः भारतीय संस्कृती ही प्राचीन अन्‌ थोर आहे. तसेच आपली भाषा अन्‌ संस्कृतीचा अभिमान आपल्याला असायला हवा. ती वैश्‍विकस्तरावर नेण्यासाठी सदैव जागरुक प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन मूर्ती कलेचे अभ्यासक आणि नवव्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी आज केले. 

कंबोडिया ः भारतीय संस्कृती ही प्राचीन अन्‌ थोर आहे. तसेच आपली भाषा अन्‌ संस्कृतीचा अभिमान आपल्याला असायला हवा. ती वैश्‍विकस्तरावर नेण्यासाठी सदैव जागरुक प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन मूर्ती कलेचे अभ्यासक आणि नवव्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी आज केले. 
शिवसंघ प्रतिष्ठान व विश्‍व मराठी परिषदेतर्फे कंबोडियात नवव्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्‍वास मेंहदळे, पत्रकार हरिष कैंची, कॅप्टन निलेश गायकवाड, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते. कंबोडिया पर्यटन विभागाचे सदस्य थॉन सिनन आणि वॅन यांनी उपस्थित राहून संमेलनाला शुभेच्छा दिल्या. 
मूर्तीशास्त्र हे सामाजिक परिवर्तन आणि अभिसरण कथन करणारे शास्त्र आहे. भारतीय संस्कृती अखंडित आणि प्रवाही कशी राहिली हे मूर्तीशास्त्राच्या अभ्यासातून समजू शकते. मूर्तीशास्त्राच्या ज्ञानामुळे आपला जगभरात ठसा उमटवला आहे. या सार्थ अभिमानाबरोबर मराठी भाषेच्या शुद्धतेबाबत आपण आग्रही असायला हवे, असे डॉ. देगलुरकर यांनी सांगितले. 

पारंपारिक अप्सरा नृत्य 
"मला भेटलेली माणसं' हा कार्यक्रम डॉ. मेंहदळे यांनी सादर केला. कंबोडियातील पारंपारिक अप्सरा नृत्याचे सादरीकरण झाले. श्री. कैंची यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजक प्रमोद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कॅप्टन गायकवाड यांनी संमेलनामागील भूमिका मांडली. अरुंधती सुभाष यांनी सूत्रसंचालन केले. 

जग अशांतीतून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत प्रतिभावान साहित्यिक वैश्‍विक शांतीचा ध्वज हाती धरु शकतात. कंबोडिया हा दुसरा भारत आहे. हा मंदिरांचा देश आहे. भारतीय कलावंत किती प्रतिभावान होते याची प्रचिती इथे आल्यावर येते. तसेच वैश्‍विक मानदंडांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे हे चांगले नाही. भारतीय कलावंत, प्रतिभावंतांमध्ये जागतिक शांतता निर्माण करण्याची शक्‍ती आहे.
- डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Sahitya Samelan