नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पुरामुळे पक्ष्यांनी केले गाळपेऱ्यात स्थलांतरण 

Live Photo
Live Photo

नाशिक ः महाराष्ट्रातील पक्ष्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे पक्ष्यांनी बाजूच्या गाळपेऱ्यात स्थलांतर केलयं. पुराच्या लोटात शेकडो पक्षी वाहून गेलेत. घरटी, अंडी आणि पिल्ल्यांना जलसमाधी मिळाली. 
गाळपेऱ्यात तीस फेल्मिंगो पक्षी स्थलांतरीत झाल्याचे चित्र काल (ता. 15) पाह्यला मिळाले. धरणातील अनेक पक्षी गाळपेऱ्याच्या आश्रयाला आले असून ग्रे-हेरॉन, परपल हेरॉन आणि इतर बदकाच्या जाती बघावयास मिळत आहेत. बाभळीच्या झाडावर घुबडे पोचलीत. तसेच वारकरी, हळदी-कुंकू, कमळ पक्ष्यांचे घरटे वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. गाळपेऱ्यात साठलेल्या पाण्यात शेवाळ आणि मासे पकडून तेथेच पक्ष्यांनी मुक्काम ठोकला आहे. कोल्ह्यांचा वावर वाढला आहे. 

वनविभागाच्या कामांचे नुकसान 
पूराचे पाणी अभयारण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचले होते. पाणी कायम असून डबक्‍यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी वनविभागाने केलेल्या कामांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भिंती वाहून गेल्याचे दिसून येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com