#AareyForest `आरे'तील वृक्षतोड म्हणजे दिल्लीतील तुर्कमान गेटसारखी घटना ः नीलम गोऱ्हे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नाशिक ः आरे कॉलनीतील वृक्ष कापण्याच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यासंबंधीचे आदेश संकेतस्थळावर पोचण्याअगोदर रात्रीतून झाडे तोडण्यात आलीत. त्यामुळे दिल्लीत एका रात्रीतून अनेकांना निराधार केलेल्या तुर्कमान गेटसारखी घटना असून तसे झाडांना निराधार करण्यात आले आहे, असे सरकारवर टीकास्त्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सोडले. 

त्या म्हणाल्या, की आरे कॉलनी लढा अनेक दिवसांपासून सुरु आहे. मुंबई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये अतिवृष्टी, महापूर असे हवामान बदलाचे परिणाम दिसताहेत. अशावेळी वृक्ष संवर्धन करायला हवे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे, की पाकव्याप्त काश्‍मिरवर हल्ला व्हावा तशी गोरेगावमधील एका रात्रीत झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शितल म्हात्रे आणि अनेक कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने वेळ दिला असता. त्याच्याआत सरकारने पाऊल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार अमान्य करुन झाडे कापून टाकावीत असे आदेश असेल तर तो सरकारने द्यावा. वृक्षांची कत्तल अयोग्य आहे. 
रामदास आठवले म्हणताहेत विकासाला विरोध नको 
जंगल तोडू नये अशी आमची भूमिका आहे, असे सांगून केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, की मेट्रोचे कार शेड करण्यासाठी जेवढी झाडे तोडायची आहेत त्याच्या तिप्पट झाडे लावायला हवीत. पर्यावरण मजबूत असायलाच हवे. त्याचवेळी मेट्रोचा प्रकल्प होणे आवश्‍यक आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Politics