कसारा घाटाजवळ "शिवशाही' पेटता-पेटता वाचली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नाशिक ः राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांमागील शुक्‍लकाष्ठ अन्‌ प्रवाश्‍यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी नाशिकमधून मुंबईकडे निघालेली शिवशाही बसगाडी कसारा घाटाजवळ पेटता-पेटता वाचली. चालकाने ब्रेक लावले आणि लायनर घासून निकामी झाले. त्यामुळे चालकाच्या बाजूच्या मागील टायरच्या आतून धुराचे लोट बाहेर पडू लागले. चालकाने प्रसंगावधान राखत बसगाडी थांबवली आणि प्रवाश्‍यांना सुखरुप खाली उतरवले. ही आग आटोक्‍यात आली खरे. पण प्रवाश्‍यांची तारांबळ आणखी झाली. सकाळी आठपासून रस्त्यावर पर्यायी बसगाडीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले. दुपारी साडेबाराला अखेर बसगाडी मिळाली.

नाशिक ः राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांमागील शुक्‍लकाष्ठ अन्‌ प्रवाश्‍यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी नाशिकमधून मुंबईकडे निघालेली शिवशाही बसगाडी कसारा घाटाजवळ पेटता-पेटता वाचली. चालकाने ब्रेक लावले आणि लायनर घासून निकामी झाले. त्यामुळे चालकाच्या बाजूच्या मागील टायरच्या आतून धुराचे लोट बाहेर पडू लागले. चालकाने प्रसंगावधान राखत बसगाडी थांबवली आणि प्रवाश्‍यांना सुखरुप खाली उतरवले. ही आग आटोक्‍यात आली खरे. पण प्रवाश्‍यांची तारांबळ आणखी झाली. सकाळी आठपासून रस्त्यावर पर्यायी बसगाडीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले. दुपारी साडेबाराला अखेर बसगाडी मिळाली. सकाळी सहाला घराच्या बाहेर पडलेले प्रवाशी दुपारी अडीचला ठाणेमध्ये पोचले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Transport

टॅग्स