2019 मध्ये दिल्लीत भगवा झेंडा फडकवणारच - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई : 2014 ची हवा आता राहिली नाही. हवामान बदलले आहे. तुम्हाला सर्वांना घेऊन मी मोठी टक्कर दिली होती. 2019 मध्ये अशी परिस्थिती नको असल्यास शिवसेनेला भरघोस मतांनी निवडून द्या. तुमची साथ मिळाली तर 2019 मध्ये दिल्लीवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशीही भूमिका त्यांनी घेतली.

देशात MeToo ही महिलांवरील लौंगीक शोषणाची मोहीम सूरू आहे. या विषयी बोलताना ठाकरे म्हणाले, जर महिलांवर अत्याचार झाला तर मीटू करीत रहायचे नाही खाडकनं कानाखाली द्यायची. गरज पडल्यास शिवसेनेकडे या आम्ही आहोत. यासाठी देशानं शिवरायांच्या महाराष्ट्राचा आदर्श घेतला पाहिजे.

नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात मोहन भागवतांनी राम मंदिरा बाबत शिवसेनेसारखा विचार मांडला. यासाठी त्यांचे अभिनंदन. या सरकारे राम मंदिर बांधणार की नाही हे जाही करावे. येत्या 25 नोव्हेंबरला आयोद्धेला जाणार आणि तिथून नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार. चार वर्ष झाले तुम्ही एकदाही आयोद्धेला का गेला नाही. उत्तर प्रदेशातून निवडून आला मग तिथे चार वर्षात किती वेळा गेला. आम्ही तुमचे शत्रू नाही. परंतु, आता जनतेच्या भावनेशी खेळणे बंद करा. त्यांच्या आशेवर पाणी पडल्यास तुमची आसनं कधी खाक होऊन जातील कळणार नाही.

Web Title: In 2019 Delhi will set up saffron flag - Uddhav Thackeray