ज्योतिष सांगते - राज्यात होणार विळ्या-भोपळ्याचे सख्य!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई -  राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जागा भरीव प्रमाणात वाढतील. भाजपच्या जागा कमी होतील. मात्र विळ्या भोपळ्याचे सख्य जमेल… हा अंदाज आहे एका ज्योतिषाचा. महाराष्ट्राच्या आज सकाळी सात वाजताच्या ग्रहदशेवरून हा होरा सांगण्यात आला असून, सध्या व्हाट्सअॅपवरील गटांगटांतून सध्या याच भविष्याची चर्चा आहे. 

या भविष्यानुसार, राजकारण आणि शासन या दृष्टीने रवि आणि मंगळ हे ग्रह महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच दशमस्थानात यशापयश व सप्तम स्थान विरोधाचे स्थान दर्शवते.

आजच्या कुंडली प्रमाणे सप्तमेश मंगळ व्ययात असून, शत्रू स्थानावर कट्टर नजर ठेवून आहे. दशमेश चंद्र भाग्यात असला, तरी राहु बरोबर ग्रहणयोग झालाआहे. लग्न स्थानात रवि असला, तरी सप्तमातून हर्षलची विचित्र आणि विक्षिप्त दृष्टी आहे. शासकीय कामकाजाचा शनि हा पराक्रम स्थानी असल्याने सप्तमेश मंगळावर करडी नजर ठेवून आहे. तथापि भाजपला अत्यंत अटीतटीचा सामना करावा लागेल. काय चुकले याचे निदान होईपर्यंत रोग बळावलेला असेल. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचे शुक्र व शनि ग्रह सुस्थितीत आहेत. एकंदरित राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या जागा भरीव प्रमाणात वाढतील. भाजपच्या जागा तुलनेने कमी होतील. 

या कुंडलीनुसार नगर जिल्ह्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. त्यानुसार कोपरगाव, संगमनेर, अकोले आणि कर्जत हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जातील. भाजपला शिर्डी, राहुरी आणि श्रीगोंद्यावर समाधान मानावे लागेल. श्रीरामपूर काँग्रेसकडे, तर नेवासा अपक्षाकडे जाईल. 

No photo description available.

सकाळी सात वाजताच्या ग्रहदशेनुसार वर्तविण्यात आलेले हे भाकीत. ते कितपत खरे ठरते हे आणखी काही वेळातच स्पष्ट होईल

astrologer predicts NCP shivsena government in maharashtra
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: astrologer predicts NCP shivsena government in maharashtra