तुतारी एक्‍स्प्रेसला कायमस्वरूपी चार डब्यांची जोडणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची पसंती असलेल्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेसला कायमस्वरूपी आणखी चार डब्यांची जोडणी करण्यात येणार आहे.

मुंबई : कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची पसंती असलेल्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेसला कायमस्वरूपी आणखी चार डब्यांची जोडणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस आणि भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेसला नवीन एलएचबी कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे. 

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी 11003-04 दादर ते सावंतवाडी तुतारी एक्‍स्प्रेस दादर टर्मिनसहून फलाट क्रमांक 7 वरून सुटते. 11 नोव्हेंबरपासून या एक्‍स्प्रेसला चार जादा कोच असणार आहेत. त्यामध्ये एसी थ्री टायर आणि स्लीपर क्‍लासचा प्रत्येकी एक-एक कोच आणि जनरल सेकण्ड क्‍लासचे दोन कोच असणार आहेत. तसेच 12157-58 पुणे- सोलापूर- पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस आणि 11025-26 भुसावळ- पुणे- भुसावळ एक्‍स्प्रेसला नवीन एलएचबी कोच बसवण्यात येणार आहे. 11 नोव्हेंबरपासून एलएचबी कोच असणारी 19 डब्यांची गाडी या मार्गावर धावणार आहे. 

web title : Connection of four coaches permanently to the Tutari Express


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Connection of four coaches permanently to the Tutari Express