भिवंडीतील महिलेने दिला चार मुलांना जन्म 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

भिवंडी : शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा सरकारी रुग्णालयात एका महिलेने चार मुलांना जन्म दिला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर अर्भकांना पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. 

भिवंडी : शहरातील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा सरकारी रुग्णालयात एका महिलेने चार मुलांना जन्म दिला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर अर्भकांना पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. 

पिराणीपाडा, शांतीनगरमध्ये राहणाऱ्या गुलशन हकीक अन्सारी (26) हिला ती गर्भवती असतानाच गर्भात चार मुले असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली होती. त्यामुळे तिने प्रसूतीसाठी मुंबईतील सायन रुग्णालयात नावनोंदणी केली होती, परंतु शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर कुटुंबियांनी तिला स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी शेगावकर, डॉ. नूतन मोकाशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री डोंगरे यांनी ताबडतोब प्रसूतीचा निर्णय घेतला. या वेळी गुलशन हिने प्रथम मुलीला जन्म दिला. नंतर तीन मुले जन्मली. ही प्रसूती नैसर्गिकरीत्या झाली असून सर्व मुलांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. गुलशन व तिच्या चारही मुलांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी दिली. 

Web Title: Four children were given birth by a woman in Bhiwandi