मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 जून 2016

मुंबई - मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन सत्तारूढ भाजपच्या मंत्र्यांकडूनच सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे वास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वीकारावे लागत आहे. रोज नवीन मंत्र्यांवरील आरोपांमुळे फडणवीस कमालीचे व्यथित झाले असून, ते पक्षश्रेष्ठींकडे याबाबत कैफियत मांडणार आहेत. विशेष म्हणजे, सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांवर आतापर्यंत कोणतेही आरोप झाले नाहीत. विविध आरोपांपासून शिवसेनेचे मंत्री चार हात दूर असल्याचे चित्र आहे. भाजपच्या तब्बल दहा मंत्र्यांवर गैरव्यवहारांचे विविध आरोप झाले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पहिल्यांदा सरकार स्थापन झाले. शपथविधी झाल्यानंतर काही दिवसांनंतर शिवसेनेचा सत्तेत समावेश झाला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर गेल्या 17-18 महिन्यांत भाजपच्या मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले. त्यामध्ये पक्षाचे सर्वांत ज्येष्ठ, अनुभवी आणि तब्बल 11 खात्यांचा कारभार सांभाळणारे एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. मंत्र्यांवरील आरोपांमुळे बेजार झालेल्या मंत्र्यांची पाठराखण करताना फडणवीस यांची दमछाक झाली आहे. रोज नवीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, गैरव्यहाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे.

Web Title: govt image tarnished by ministers