बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी तेलंगणातील शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हे कार्यकर्ते मुंबईत आले होते. 

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी तेलंगणातील शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हे कार्यकर्ते मुंबईत आले होते. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही भारतरत्न देण्याची मागणी त्यांनी या वेळी केली आहे. या कार्यकर्त्यांनी आपले निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी आपले आयुष्य वेचले. या नेत्यांना भारतरत्नने सन्मानित केले पाहिजे, असे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठवले आहे.

बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, मात्र मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Honor Balasaheb Thackeray with Bharat Ratna Award