VIDEO ! दूर्बिणीशिवाय सुर्यग्रहण कसं पाहता येईल? व्हिडीओ नक्की पाहा..

VIDEO ! दूर्बिणीशिवाय सुर्यग्रहण कसं पाहता येईल? व्हिडीओ नक्की पाहा..

ठाणे : देशात 26 डिसेंबरला दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामीळनाडू या राज्यातील काही भागातून दुर्मिळ असे कंकणाकृती तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास असणार आहे. परंतु हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी तुमच्याकडे सौरचष्मा, दुर्बिण नसल्यास. चिंता करण्याची गरज नाही. प्रोजेक्‍शन पद्धतीद्वारे सूर्यग्रहण पहाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.

न्यास ट्रस्ट आणि प्रथम विज्ञान कार्यक्रम यांनी बॉल-मिरर प्रोजेक्‍टर कसा बनवायचा व आरशाद्वारे सूर्याची प्रतिमा भिंतीवर कशी पहायची याविषयीचा व्हिडीओ तयार केला असून घरच्याघरी टाकाऊ साहित्यापासून हा प्रोजेक्‍टर बनवून एकाचवेळी अनेकजण हे सूर्यग्रहण पाहू शकता. 

सूर्यग्रहणात सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये, ग्रहण बघण्यासाठी खास तयार केलेल्या सौर-चष्म्याचाच वापर करावा लागतो. परंतू सर्वांकडेच सौर चष्मे किंवा ग्रहण पहाण्यासाठी लागणारी खास दुर्बिण नसते. परंतू, आता आपण घरच्याघरी सूर्यग्रहण पाहू शकतो. त्यासाठी न्यास ट्रस्ट आणि प्रथम विज्ञान कार्यक्रम यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर अपलोड केला आहे.

ग्रहणाची वेळ 

खंडग्रास ग्रहणाची सुरुवात 26 डिसेंबरला सकाळी 7.59 मिनिटांनी व शेवट दुपारी 1.35 मिनिटांनी होईल. तर खग्रास ग्रहणाची सुरुवात सकाळी 9.04 मिनिटांनी आणि शेवट दुपारी 12.30 मिनिटांनी होईल. विदर्भ, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 8.10 वाजेपासून दिसेल आणि सकाळी 11 वाजता संपेल. 

सूर्यग्रहण पहाण्यासाठी 'बॉल - मिरर प्रोजेक्‍टर'

सूर्यग्रहण पहाण्यासाठी 'बॉल - मिरर प्रोजेक्‍टर' असे या व्हिडीओचे नाव आहे. यातील प्रोजेक्‍शन मेथडद्वारे बॉल मिरर प्रोजेक्‍टर कसा बनवायचा व आरशाद्वारे सूर्याची प्रतिमा भिंतीवर कशी घ्यायची याविषयी माहिती दिली आहे. सूर्याचे स्थान हळू-हळू बदलत असते मग इतका वेळ आरसा हातात कसा धरणार? म्हणून त्याला खाली बॉलचा आधार दिला आहे. गोलाकार बॉल सहज कोणत्याही दिशेला वळवता येतो. त्यामुळे सूर्याचे स्थान बदलले तर बॉलवर लावलेल्या आरशाची स्थिती बदलून प्रतिमा मिळवणे सोपे जाते. जर तुमच्याकडे बॉल नसेल तर कोणतीही गोलाकार जड वस्तू जसे की नारळ आदीं सारख्या आधार म्हणून वापरु शकता अशी माहिती न्यास ट्रस्टच्या सोनल नाईक यांनी दिली. सोनल नाईक यांच्या युट्यूब चॅनेलला भेट देऊन तुम्ही कुठेही या प्रोजेक्‍टरच्या सहाय्याने सूर्यग्रहणाचे प्रतिबिंब भिंतीवर पाहून त्याचा आनंद घेऊ शकता. 

सुर्यग्रहण का होते? 

कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणाच्यावेळी पृथ्वी चंद्राचे अंतर कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्य बिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते, पण कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वीचे अंतर जास्त असते. तेव्हा सूर्य बिंब मोठे आणि चंद्र बिंब लहान असते. त्यामुळे चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही. त्यामुळे कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते. त्यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. या ग्रहणाच्यावेळी चंद्राची गडद सावली ही केवळ 118 किलोमीटरच्या रुंद पट्ट्यातून जात असल्याने त्याच प्रदेशातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. हे या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण आहे. 2020 मध्ये 21 जूनला पुन्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. 

WebTitle : How can a solar eclipse be viewed without a telescope Watch this video

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com