जिहादी व्हिडिओ असलेली 356 संकेतस्थळे बंद

मंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

मुंबई - सोशल मीडियाचा वापर करून तरुणांची माथी भडकावून त्यांना जिहादी बनवू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दणका दिला आहे. एटीएसने आठ महिन्यांत जिहादी व्हिडिओ असलेली 356 संकेतस्थळे बंद केली आहेत. आखाती देशांत काही ऑपरेटर फेसबुक आणि ट्‌विटरवर जिहादी व्हिडिओ संकेतस्थळावर अपलोड करत आहेत. 

गेल्या वर्षी मालाडमधील मालवणी येथून एकाच वेळी पाच तरुण बेपत्ता झाले होते. आखाती देशात गेलेल्या तरुणाला जिहादविषयीचे व्हिडिओ दाखविण्यात आले होते. यंदा पुण्यातील एका तरुणीला अशाच प्रकारे जिहादी बनविण्याचा डाव होता. मात्र पुणे एटीएसने त्या मुलीचे वेळीच समुपदेशन केले. सोशल साइटवर जिहादी व्हिडिओ, पुस्तके अपलोड करणाऱ्यांवर एटीएसचे अधिकारी लक्ष ठेवतात. आठ महिन्यांत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी 356 वेबसाइट आणि "यूआरएल‘ही ब्लॉक केली आहेत. त्या वेबसाइटवर जिहादविषयीचे व्हिडिओ अपलोड केले जात होते. एटीएसचे अधिकारी महाविद्यालयांत जाऊन याविषयी जागृती करत आहेत. सोशल मीडियावर अपलोड होणाऱ्या साहित्यावरही लक्ष ठेवून असल्याचे गृह विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

लहान मुलांचाही वापर 

चिंतेची बाब म्हणजे, 16 ते 25 वयोगटांतील मुलांना जिहादविषयीचे व्हिडिओ दाखवून त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. नंतर भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर होतो. नुकताच एका आखाती देशातील संकेतस्थळावर सीरियात लहान मुलांना एके-47 रायफल चालविण्याचे प्रशिक्षण देत असलेला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या लहान मुलांना अमानुष मारहाण करून जिहादी केले जाते.

Web Title: Jihadi video with 356 sites closed