हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातच मुनगंटीवार-परब यांच्यात खडाजंगी

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातच मुनगंटीवार-परब यांच्यात खडाजंगी

मुंबईः आजपासून दोन दिवसीय राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भाजप या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोकशाहीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या आरोपावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पलटवार केला आहे. लोकशाहीवर बोलण्याआधी राज्यपालांना १२ आमदारांची यादी राज्यपालांना मंजूर करायला सांगा, असं म्हटलं आहे. 

आज हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या तयार करण्यात येतात असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मात्र या समित्यावर समिती प्रमुखाची आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असते. मात्र त्याचीही यादी दिलेली नाही. याबाबत बैठक घेण्यात आल्या पाहिजे. पण अस काही होत नसल्यानं महाविकास आघाडी सरकारकडून लोकशाहीला बेशुद्ध करण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

मुनगंटीवार यांनी असा आरोप केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. परब यांनी म्हटलं की, आम्ही बैठकीचे आयोजन करतो. तुम्ही राज्यपालांना १२ आमदारांच्या यादीचा निर्णय घेण्यास सांगा, असा सणसणीत टोला परब यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे. 

या दोन्ही नेत्यांमध्ये सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्दा सभागृहाबाहेरचा असल्याचं म्हणत वादावर पडदा टाकला. 

दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच  विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विधान भवनाच्या बाहेर भाजप आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर वेश परिधान करुन सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार रवी राणा शेतकऱ्यांच्या  अत्याचारांचं फलक घालून वेलमध्ये आले. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

Maharashtra Assembly 2020 winter session Sudhir Mungantiwar Anil Parab fight

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com