लाल गाडी बंद पडली तर काय? जाणून घ्या एसटी महामंडळाचा नवा नियम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

तुम्ही एसटीच्या लाल गाडीतून प्रवास करत असाल आणि ती वाटेत बंद पडली किंवा पंक्चर झाली. तर मागून येणाऱ्या एशियाड किंवा शिवशाही अशा कोणत्याही गाडीतून तुम्हाला प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रवासासाठी लाल गाडीतील प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असा उपयुक्त निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने अडचणीच्या काळातील श्रेणी वाद आता संपुष्टात आणला आहे. म्हणजे, तुम्ही एसटीच्या लाल गाडीतून प्रवास करत असाल आणि ती वाटेत बंद पडली किंवा पंक्चर झाली. तर मागून येणाऱ्या एशियाड किंवा शिवशाही अशा कोणत्याही गाडीतून तुम्हाला प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रवासासाठी लाल गाडीतील प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असा उपयुक्त निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

आणखी वाचा : गुजरात दंगलीमधील ‘तो’ भेदरलेला चेहरा, करतोय टेलर काम

यापूर्वी भररस्त्यात एसटीत बिघाड किंवा अपघात झाल्यास, त्याच श्रेणीची बस उपलब्ध होईपर्यंत प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यात जर पाठीमागून उच्च श्रेणीची बस आल्यास जादा भाडे द्यावे लागत होते. मात्र, आता अशा आणिबाणीच्या स्थितीत एसटी प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता शिवनेरी, शिवशाही आदी गाड्यांमधून जाता येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा : काश्मीर खोऱ्यात अद्यापही दहशतवादी सक्रीय

रस्त्यावर धावणाऱ्या खिळखिळ्या एसटीचे अपघात आणि बिघाडाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवासी संख्येतही घट झाली आहे. एसटीचा मार्गात अपघात किंवा बिघाड झाल्यास प्रवाशांना, त्याच श्रेणीच्या बसमधून पुढील प्रवास करणे सक्तीचे होते. मात्र आता मूळ तिकिटाच्या दरात प्रवाशांना पुढचा प्रवास एसटीच्या कोणत्याही गाडीने करता येईल. एसटीच्या प्रवासीभीमूख निर्णयामुळे आता प्रवासी संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय सर्व प्रकारच्या पासधारकांना सुद्धा लागू राहणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक लवकरच एसटी महामंडळाकडून काढण्यात येणार आहे.

आणखी वाचा : Chandrayaan 2 : के. सिवन यांच्यासह सारा देश हळहळला!

याबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, ‘अपघात किंवा गाडी बंद पडल्याच्या घटनेनंतर एसटीच्या उच्च श्रेणीच्या बसमधून कमी श्रेणीच्या प्रवाशांना नेले जात नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होत होता. त्यामुळे प्रवाशांना आपातकालीन स्थितीत कोणत्याही श्रेणीची बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.’

एसटीची बस श्रेणीची संख्या

  1. साधी बस - 16000
  2. यशवंती-मिडी - 250
  3. हिरकणी निमआराम - 800
  4. शिवनेरी आणि अश्‍वमेघ वाताणुकूलीत - 120
  5. शिवशाही - 1000
  6. शहर वाहतूक - 253

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state transport grade rule in emergency cancelled diwakar raote