मुंबईत सहा मार्चला मराठा महामोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईत येत्या सहा मार्चला मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबईत घेण्यात आला. या अगोदर मुंबईत येत्या 31 जानेवारी रोजी महामोर्चा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. आता त्या दिवशी राज्यभरात चक्‍का जाम करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

आपल्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर जिल्हावार मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर मुंबईत महामोर्चाचे आयोजन 31 जानेवारी रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात 31 जानेवारी रोजी साजरे केला जाणारा माघी गणपती उत्सव यामुळे जोरदार तयारी करता येणार नाही, असा काही कार्यकर्त्यांनी विचार मांडला होता.

यानंतर महामोर्चाची तारीख अंतिम करण्यासाठी आज मुंबईत वडाळा येते राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी राज्यातील 43 हून अधिक मराठा समाजाच्या संघटनांनाही बोलावण्यात आले होते, असे सांगण्यात आले.

Web Title: maratha morcha in mumbai on 6 march