छोटा भाऊ म्हणून युतीसाठी तयार आहोत: मनसे

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

आमच्या पक्षाची परिस्थिती आता आहे यापेक्षा आणखी किती वाईट होणार आहे? मात्र मुंबईच्या हितासाठी ही युती व्हावी

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. या निवडणुकीसाठी युतीचा मनसेने दिलेला प्रस्ताव शिवसेनेकडून झिडकारण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर, नांदगावकर यांनी भावना व्यक्त केल्या.

नांदगावकर म्हणाले -

  • अजूनही वेळ गेलेली नाही. मनसेच्या प्रस्तावाचा शिवसेनेने विचार करावा
  • दोघे भाऊ एकत्र यावेत. शिवसेनेकडून या निवडणुकीसाठी ज्या जागा दिल्या जातील त्या स्वीकारण्यास मनसे तयार आहे.
  • आमचा प्रस्ताव अगदी सोपा आहे. छोटा भाऊ म्हणून युतीसाठी मनसे तयार आहे. मनसेचा अमुकच जागा हवी, अशा कोणत्याही स्वरुपाचा व कसलाही आग्रह नाही.
  • मी स्वत: "मातोश्री'वर युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. उद्धव ठाकरे यांची भेट झाली असती; तर अजून चांगली चर्चा होऊ शकली असती.
  • आमच्या पक्षाची परिस्थिती आता आहे यापेक्षा आणखी किती वाईट होणार आहे? मात्र मुंबईच्या हितासाठी ही युती व्हावी. ही युती होऊ नये, अशी मनसेकडून तरी कोणाचीही इच्छा नाही.
Web Title: MNS makes last attempt to join hands with Shiv Sena