मध्य रेल्वेसाठी 56 वर्षांत फक्त 85 लोकल 

मध्य रेल्वेसाठी 56 वर्षांत फक्त 85 लोकल 

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांच्या पदरी नेहमी निराशाच येते. पश्‍चिम रेल्वेवर बंबार्डियर लोकल धावत असताना मध्य रेल्वे अद्यापही जुन्या लोकलच्या आधारावरच आहे. मध्य रेल्वेवरील नवीन लोकल, वाढीव फेऱ्या यांची 56 वर्षांत फारशी प्रगती झालेली नाही. मध्य रेल्वेला 56 वर्षांत अवघ्या 85 लोकलच मिळाल्यामुळे दरदिवशींच्या फेऱ्यांमध्ये फक्त एक हजार फेऱ्यांची वाढ झाली आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर दररोज 40 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र हा प्रवास करताना मेन लाईन आणि हार्बरवरील प्रवाशांना फारसा दिलासा मिळालेला नाही. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर "सिमेन्स' आणि पश्‍चिम रेल्वेवर "बम्बार्डियर' लोकल धावत असतानाही हार्बरवरील प्रवासी मात्र नवीन लोकलपासून वंचित आहेत. 1960 मध्ये मध्य रेल्वेच्या ताफ्यात असलेल्या 36 लोकलच्या दरदिवशी 520 फेऱ्या होत होत्या. 2016 पर्यंत ही संख्या 122 एवढी झाल्याने एक हजार 660 फेऱ्यांपर्यंत पोहोचली. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार फेऱ्या कमी पडत आहेत, त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. 

वर्ष : लोकल गाड्या फेऱ्या 
1960 - 36 हजार 520 
1970 - 41 हजार 606 
1980 - 51 हजार 859 
1990 - 6 लाख 91 हजार 23 
2000 - 8 लाख 21 हजार 80 
2010 - 11 लाख 11 हजार 462 
2016 - 12 लाख 21 हजार 660 

40 लोकल फेऱ्यांची भर 
मध्य रेल्वेकडून लोकल प्रवाशांसाठी लवकरच नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. यात 40 फेऱ्यांची भर पडणार असून यात हार्बर आणि ट्रान्स हार्बरमार्गासाठी 28 फेऱ्या आहेत; तर उर्वरित फेऱ्या मेन लाईन प्रवाशांसाठी असतील. 

प्रवासी एसी लोकलच्या प्रतीक्षेत 
एसी लोकल वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेकडे दाखल झाली आणि तिच्या चाचण्याही घेण्यात आल्या; परंतु कुर्ला ते सीएसटीदरम्यान कमी उंचीचे पूल आणि एसी लोकलची जादा असलेली उंची यामुळे ही लोकल पुन्हा पश्‍चिम रेल्वेकडे गेली. पश्‍चिम रेल्वेने एसी लोकल चालवण्यास समर्थता दर्शविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com