महिला वैमानिकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - मुंबईतील घाटकोपरच्या माणिकलाल परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या आवारात आज (गुरुवार) दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळले. या विमान अपघातात विमानातील महिला वैमानिकासह विमानातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक पादचाऱ्याचाही मृत्यू झाला. परंतु, महिला वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दुर्घटना घडलेला परिसर हा मुंबईतील गर्दीचा परिसर आहे. तिथे मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. या भागात मोठमोठ्या इमारतीदेखील आहेत. त्यामुळे, या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असती, परंतु, वैमानिक मारिया यांच्या सतर्कतेमुळे या दुर्घटनेतील मोठी हानी टळली आहे. वैमानिक मारिया यांच्या प्रसंगावधनामुळे विमान बांधकाम सुरु असलेल्या साईटच्या ठिकाणी कोसळले.

दरम्यान, चार्टर्ड विमान घाटकोपर पश्चिमेत जागृती पार्क परिसरातील जीवदया लेनमधील परिसरात बांधकाम सुरु असलेल्या आवारात हे विमान कोसळले. या विमान दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये वैमानिक कॅप्टन राजपूत, कॅप्टन मारिया, इंजिनिअर सुरबी, टेक्निशियन मनीष पांडे यांचा समावेश आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दल आणि आप्तकालीन यंत्रणेचे पथक घटनास्थळी पोचले असून, पुढील बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. 

पावसाचा जोर वाढल्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील विमान बाजूला करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
घाटकोपर विमान अपघात; विमानातील चौघांसह पादचाऱ्याचा मृत्यू

Web Title: mumbai plane crash five dead pilots role in ghatkopar plane crash