नालासोपाऱ्याचे कर्नाटक कनेक्‍शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मुंबई : नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक करण्यात आलेला वैभव राऊत आपल्या कारवायांसाठी वापरत असलेले सिमकार्ड त्याच्या नावावर नाहीच; पण ते त्याच्या आधीपासूनच वापरात असल्याने मुख्य सूत्रधार कोण, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. दरम्यान, शनिवारी पुणे, सोलापूरमधून जप्त केलेला शस्त्रसाठा पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित आहेत का, हे तपासण्यासाठी बेंगळूरु पोलिसांचे विशेष पथक महाराष्ट्रात येण्याची शक्‍यता आहे. 

शनिवारी पुणे, सोलापूर येथून 10 गावठी पिस्तुलांसह शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांचा माग काढताना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील काही संशयास्पद मोबाईल संभाषण महाराष्ट्र पोलिसांना दिले होते. त्या संभाषणाची तपासणी करूनच पोलिसांनी वैभव राऊतसह तिघांना अटक केली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे आणि वैभव राऊत हे एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे या तिघांचा लंकेश यांच्या हत्येशी काही संबंध होता का, या दृष्टीनेही तपास केला जाण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

वैभवकडे सापडलेले सिमकार्ड त्याच्या ताब्यात येण्याआधीच ऍक्‍टिव्ह झाल्याने ते यापूर्वीही एखाद्या संशयित कारवाईसाठी वापरले गेले का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. वैभव हा सुधान्व गोंधळेकर आणि शरद कळसकर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करत असल्याची शक्‍यता आहे. 

'सिम'चे गूढ 
वैभवकडे सापडलेले सिमकार्ड कोणी विकत घेतले होते याचा पोलिस तपास करत आहेत. कदाचित यातून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचता येईल. गोंधळेकर याने वैभव व शरदला बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिल्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Nalasarparka to Karnataka connection