शिवस्मारक वेळेतच पूर्ण करणार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुंबईजवळ अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचा आराखडा तयार आहे. स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

शिवस्मारकासंदर्भात आढावा बैठक कफ परेड येथील शिवस्मारक कार्यालयात झाली, त्या वेळी फडणवीस बोलत होते. बैठकीला शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव सी. पी. जोशी, मुख्य अभियंता हिमांशू श्रीमाळ, अधीक्षक अभियंता आर. टी. पाटील, कार्यकारी अभियंता डी. डी. बारवटकर, आर्किटेक्‍ट जाधव, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. निविदा प्रक्रियेचे काम लवकरच पूर्ण करून नवीन वर्षात स्मारकाच्या कामास सुरवात होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Shivsmarak ready will meet by devendra fadnavis