मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव 2014 पासून केंद्र सरकारकडे खितपत पडला आहे. सरकारने तातडीने त्याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मी मराठी एकीककरण समितीतर्फे 15 सप्टेंबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. 

मुंबई ः मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव 2014 पासून केंद्र सरकारकडे खितपत पडला आहे. सरकारने तातडीने त्याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मी मराठी एकीककरण समितीतर्फे 15 सप्टेंबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. या स्वाक्षऱ्या असलेले पत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे. 

साहित्य अकादमीने मान्यता देऊनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. ऑगस्ट 2016 मध्ये मराठी साहित्य महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले; मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, तसेच अन्य मागण्यांसाठी 24 साहित्य संस्थांनी एका व्यासपीठाची स्थापना केली. या व्यासपीठाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी अनुकूल असल्याचे केंद्र सरकार अनुकूल असल्याचे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी यांनी सांगितले. 

पण हा दर्जा मिळण्यास किती कालावधी लागेल, याबाबत साशंकता असल्याने मी मराठी एकाकीकरण समितीने घरोघरी जाऊन सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष प्रमोद मसुरकर यांनी दिली. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signature campaign to get Marathi elite status