कारखान्यांकडे 123 कोटी रुपये थकीत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

28 कारखानदारांकडे एक कोटींपासून ते 27 कोटीपर्यंतची थकबाकी
मुंबई - आगामी ऊसगाळप हंगाम तोंडावर आला असताना, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची गेल्या वर्षातील सुमारे सव्वाशे कोटींची थकबाकी अद्यापही भागवलेली नाहीत. साखर कारखान्यांकडे तब्बल एक कोटी रुपयांपासून ते 27 कोटी रुपयांपर्यंतची देणी थकीत आहेत. साखर कारखानदारांकडून सणासुदीचे औचित्य साधून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची बिले काढली जातात. त्यामुळे कारखानदारांनी येत्या दिवाळीला ही थकबाकी भागवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी साखरेचे दर प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांच्या खाली होते. या वर्षी दर 3 हजार 500 रुपयांपर्यंत गेले होते. साखरेच्या दरात सातत्याने चढऊतार होत आहेत. गेल्या काही वर्षांतील दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले आहे. साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालू शकलेले नाहीत. यासोबत इतरही अनेक कारणांमुळे साखर कारखानदारी तोट्यात चालली आहे.

राज्यातील 71 साखर कारखान्यांचा गेल्या तीन वर्षांतील संचित तोटा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्या हंगामात राज्यात 178 साखर कारखाने सुरू होते. या कारखान्यांमधून सुमारे 84 लाख टन साखर उत्पादन झाले. एफआरपीनुसार गाळप केलेल्या उसाची सोळा हजार 471 कोटी रुपयांची देयके होतात. आर्थिक अडचणीच्या काळातही राज्यातील साखर कारखानदारांनी सोळा हजार 382 कोटींची बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. येत्या 5 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊसगाळप हंगाम सुरू होणार आहे. तरीही ऑक्‍टोबरअखेर शेतकऱ्यांचे गेल्या वर्षातील एफआरपीचे 123 कोटी रुपये अजूनही कारखानदारांकडे थकीत आहेत. 178 पैकी 28 साखर कारखान्यांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. शेजारील राज्यांमध्ये एफआरपी थकबाकीचे प्रमाण लक्षणीय आहे. त्या तुलनेत राज्यातील थकबाकी खूपच कमी आहे.

कारखाने अडचणीत
गेल्या दहा महिन्यांत साखरेचा सरासरी दर 2 हजार 979 रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टनाला सुमारे 2 हजार 600 ते 700 रुपये एफआरपी द्यावी लागते. त्यामुळे कारखान्यांना साखरेचा दर आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवताना अडचणी येत आहेत.

Web Title: sugar factory arrears

टॅग्स