विधान परिषदेच्या निवडणुका बहुरंगी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बुधवारी अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज सादर केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज्य विधान परिषदेवर जाणाऱ्या सदस्यांच्या निवडणुका बहुरंगी होण्याची शक्‍यता आहे. येत्या 5 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांचे नेमके चित्र स्पष्ट होईल.

मुंबई - सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बुधवारी अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज सादर केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज्य विधान परिषदेवर जाणाऱ्या सदस्यांच्या निवडणुका बहुरंगी होण्याची शक्‍यता आहे. येत्या 5 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांचे नेमके चित्र स्पष्ट होईल.

राष्ट्रवादीचे प्रभाकर घारगे (सांगली-सातारा), संदीप बाजोरिया (यवतमाळ), अनिल भोसले (पुणे) व राजेंद्र जैन (भंडारा-गोंदिया), भाजपचे गुरूमुख जगवानी (जळगाव) तसेच अमरनाथ राजूरकर (नांदेड) या विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल 5 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी 22 नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने कॉंग्रेसची आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू होती. यासंदर्भात दोन्ही कॉंग्रेसच्या बैठकाही झाल्या होत्या. सहा जागांपैकी तीन जागा सोडण्याची कॉंग्रेसची मागणी होती; मात्र सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसची मागणी फेटाळण्यात आली आली. त्यामुळे सहाही जागांवर आता दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहिले आहे. स्थानिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा करण्यात आली; मात्र युतीतील तणाव लक्षात घेता या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे किती मनोमीलन होते, यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे.

अखेरच्या दिवशी कोण कोण रिंगणात?
यवतमाळ

संदीप बाजोरिया (राष्ट्रवादी), शंकर बडे (कॉंग्रेस), तानाजी सावंत (शिवसेना-भाजप).

पुणे
अशोक यनपुरे, संजय जगताप (भाजप), अनिल भोसले (राष्ट्रवादी कॉंग्रेस), विलास लांडे (राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डमी), गणेश गायकवाड, बाबू वागसकर (अपक्ष), माऊली ऊर्फ ज्ञानेश्‍वर खंडागळे (मनसे).

नांदेड
अमर राजूरकर (कॉंग्रेस), श्‍यामसुंदर शिंदे (अपक्ष).

सांगली-सातारा
युवराज बावडेकर (भाजप), शेखर गोरे (राष्ट्रवादी), अरुण लाड (डमी अर्ज, चुकून पहिला बाद झाला तर), मोहनराव कदम (कॉंग्रेस), शेखर माने (कॉंग्रेस बंडखोर, अर्ज मागे घेण्याची शक्‍यता).

जळगाव
चंदू पटेल (भाजप), सुरेश चौधरी (शिवसेना), गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी), लता छाजेड (कॉंग्रेस), नितीन बरडे (खान्देश विकास आघाडी).

भंडारा-गोंदिया
राजेंद्र जैन (राष्ट्रवादी), प्रफुल अग्रवाल (कॉंग्रेस), परिणय फुके (भाजप).

Web Title: vidhan parishad election