दोन्ही कॉंग्रेस आमनेसामने

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

जळगावमधून कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची माघार; सहा जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात
मुंबई - विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पुन्हा काडीमोड झाला आहे. 19 नोव्हेंबरला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी तीन मतदारसंघांत दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली.

विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या मुदतीत कॉंग्रेसने पाचपैकी चार मतदारसंघांतील आपले उमेदवार कायम ठेवले.

यवतमाळमध्ये राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार दिलेला नाही. विद्यमान आमदार संदीप बाजोरिया यांना अपक्ष उभे करून राष्ट्रवादीने त्यांच्या पाठीशी ताकद लावली आहे. त्यामुळे सांगली-सातारा, पुणे आणि भंडारा-गोंदिया या तीन मतदारसंघांत दोन्ही कॉंग्रेसमध्ये टक्कर होईल. परिणामी दोन्ही कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप-शिवसेना युती किंवा अपक्ष उमेदवारांना होण्याची शक्‍यता आहे. आघाडी निश्‍चित झाल्यानंतर विधान परिषदेच्या जागावाटपासाठी दोन्ही कॉंग्रेस नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक होऊनही आघाडीत जागावाटपाबाबत सहमती होऊ शकली नाही. कॉंग्रेसने विधान परिषदेच्या सहापैकी तीन जागांची मागणी केली होती. राष्ट्रवादीला नांदेडसह भंडारा-गोंदिया आणि सांगली-सातारा किंवा यवतमाळची जागा हवी होती; परंतु राष्ट्रवादीने विद्यमान जागा सोडण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसने सहाही जागांवर उमेदवार उभे केले होते.

अर्ज माघारीच्या मुदतीत दोन्ही कॉंग्रेसची चर्चा होऊन जागावाटपाचा तिढा सुटेल, असे वाटत होते; मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आघाडीत बिघाडी झाली.

जळगावमधून राष्ट्रवादीची माघार
राष्ट्रवादी कॉंग्रेसने जळगावमधून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अनपेक्षितरीत्या मागे घेतली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवार लता छाजेड यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे जळगावमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार चंदूलाल पटेल आणि अपक्ष उमेदवार ऍड. विजय भास्कर पाटील यांच्यात सामना रंगेल. जळगावमध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात एकूण सात अपक्ष रिंगणात आहेत.

विलास लांडे यांची बंडखोरी
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघात राष्ट्रवादीला कॉंग्रेस उमेदवारासह बंडखोर उमेदवार विलास लांडे यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार असलेल्या विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला आहे.

नांदेडमध्ये राष्ट्रवादीचा अपक्षाला पाठिंबा
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने नांदेडमध्ये अपक्ष उमेदवार श्‍यामसुंदर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसचे अमरनाथ राजूरकर आणि अपक्ष शिंदे यांच्यात सरळ लढत आहे.

Web Title: vidhan parishad election